मुंबई -मराठी सिनेसृष्टीची बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या आयुष्यात नुकतेच प्रेम बहरले आहे. 'बिग बॉस'मधून नेहा प्रसिद्धीझोतात आली होती. आता पुन्हा एकदा ती तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे.
नेहा पेंडसेच्या आयुष्यात फुलले प्रेम, 'या' व्यक्तीला करतेय डेट - सोशल मीडिया news
नेहा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. अशातच तिने एका व्यक्तिसोबतचा फोटो शेअर करुन अप्रत्यक्षरित्या आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
नेहा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. अशातच तिने एका व्यक्तिसोबतचा फोटो शेअर करुन अप्रत्यक्षरित्या आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिच्यासोबत फोटोमध्ये दिसणारा व्यक्ती हा उद्योगपती आहे. 'शार्दुल सिंग बयास' असे त्याचे नाव आहे. लवकरच दोघेही लग्नबेडीत अडकणार असेही बोलले जात आहे.
शार्दुलनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहासोबतचे बरेचसे फोटो शेअर केले आहेत. यावरून दोघांमध्येही चांगली बाँडिग असल्याचे दिसुन येते. आता नेहा त्यांच्या नात्याविषयी अधिकृत माहिती कधी देते, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.