महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नेहा पेंडसेची लगीनघाई, पाहा संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो - Neha Pendase photo

नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अतिशय आनंदी असल्याचं पाहायला मिळतं. चाहत्यांनीही तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Neha Pendase getting Married with boyfriend Shardul singh
नेहा पेंडसेची लगीनघाई, पाहा संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो

By

Published : Jan 5, 2020, 6:34 PM IST

मुंबई - ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसे आज (५ जानेवारी) लग्नबंधात अडकणार आहे. बॉयफ्रेंड शार्दुल सिंह याच्यासोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे फोटो नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडेल.

नेहा मराठमोळ्या पद्धतीने विवाह करणार आहे. दोन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर तिने शार्दुलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. नववर्षाची सुरूवात ती शार्दुलसोबत लग्नगाठ बांधुन करत आहे.

हेही वाचा -'स्टार प्रवाह'वर नवा सिंगिंग रिअ‌ॅलिटी शो 'मी होणार सुपरस्टार'

नेहाने 'मे आय कम इन मॅडम' या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तिने बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'बिग बॉस' या कार्यक्रमामुळेही ती चर्चेत आली होती.

नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अतिशय आनंदी असल्याचं पाहायला मिळतं. चाहत्यांनीही तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता चाहत्यांना तिच्या लग्नाच्या फोटोंची आतुरता आहे.

हेही वाचा -'तत्ताड' सिनेमाचं पहिलं लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित, तगडी स्टारकास्ट

ABOUT THE AUTHOR

...view details