महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अंकित मोहनच्या ॲक्शनसोबत ‘बाबू'मध्ये दिसणार नेहा महाजनचे ग्लॅमर! - अंकित मोहनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'बाबू'

ॲक्शनने भरलेला मराठी चित्रपट ‘बाबू’मधील काही ॲक्शन दृश्यांचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स असून आता त्याजोडीला आता या चित्रपटात ग्लॅमरस नेहा महाजनची एन्ट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री रूचिरा जाधवही या चित्रपट महत्वपूर्ण भूमिकेत आहे.

नेहा महाजन
नेहा महाजन

By

Published : Oct 28, 2021, 3:31 PM IST

कोरोना परिस्थितीमध्ये सुधार आल्यानंतर ॲक्शनने भरलेला चित्रपट ‘बाबू’मधील काही ॲक्शन दृश्यांचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स असून आता त्याजोडीला आता या चित्रपटात ग्लॅमरस नेहा महाजनची एन्ट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री रूचिरा जाधवही या चित्रपट महत्वपूर्ण भूमिकेत आहे.

अंकित मोहनच्या ॲक्शन सोबत ‘बाबू' मध्ये दिसणार नेहा महाजनचे ग्लॅमर

अंकित मोहनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'बाबू' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या एकदम जोमात सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अंकितचे ऍक्शन सीन्स व्हायरल झाले होते. ऍक्शनचा धमाका असणाऱ्या या चित्रपटात आता नेहा महाजनची एंट्री झाली आहे. सध्या तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यामुळे नेहाचा हा एकंदर पेहराव बघून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. आता नेहाची भूमिका काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे असून निर्माता बाबू के. भोईर हे आहेत. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे. ॲक्शन सीन्सचा तडका आणि भरपूर रोमान्स असलेला ‘बाबू’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - ‘शोमन’ सुभाष घई यांचा मराठी चित्रपट ‘विजेता’ पुनःप्रदर्शनासाठी सज्ज!

ABOUT THE AUTHOR

...view details