मुंबई -बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या वर्षात तिने बरीच सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. सध्या ती इंडियन आयडॉलच्या अकराव्या पर्वाच्या परीक्षकाच्या भूमिकेत आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळ्या थिमनुसार गाणी सादर केली जातात. सध्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नेहा तिच्या एक्स बॉयफ्रेंडसाठी गाणं गाताना दिसून येते.
कॉमेडी क्विन भारती आणि तिचा पती हर्ष यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात 'शादी स्पेशल' भाग प्रसारित होणार आहे. भारती आणि हर्षच्याही लग्नाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या विनोदांनी सेटवर हास्यकल्लोळ निर्माण केला होता.
हेही वाचा -अक्षयने दिलेले 'ते' अमुल्य झूमके घालून ट्विंकलने शेअर केला फोटो