मुंबई - बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. असे असले, तरी काही गोष्टींमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत असते. कधी तिला तिच्या जास्त भावनिक असण्यामुळे ट्रोल केलं जात, तर कधी तिच्या उंचीवरून. मात्र, एका कॉमेडी कार्यक्रमात तिच्या उंचीसोबतच तिच्या हावभावावरून तिची खिल्ली उडवण्यात आली. यामुळे नेहा प्रचंड संतापली होती. त्यानंतर तिने एका पोस्टद्वारे त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
कॉमेडीयन किकू शारदाच्या एका कार्यक्रमात नेहाच्या उंचीवरून तिची खिल्ली उडवण्यात आली होती.
हेही वाचा -मराठी भाषेतही प्रदर्शित होणार 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज
माझ्याबद्दल तुमच्या मनात एवढा दोष असेल, तर माझ्या गाण्यांवर नाचणे, एन्जॉय करणे बंद करा. अशी खिल्ली उडवणं हे प्रचंड त्रासदायक असल्याचं तिने म्हटलं होतं. नेहाचा भाऊ आणि संगीतकार टोनी कक्कर यानेही एक पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त केला.
नेहाने आजवर जे काही मिळवलं आहे, ते तिच्या जीद्दीवर आणि टॅलेंटमुळे मिळवले आहे. तिच्या उंचीमुळे आधीच तिला फार कठीण प्रसंगाना सामोरं जावं लागलं आहे. मात्र, कठीण परिस्थितींना सामोरे जाऊन तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिची अशी टर उडवणं, योग्य नाही, असं टोनीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा -जयपूर येथील 'अनप्लग्ड' या कार्यक्रमात विद्याने उलगडले खास किस्से
यानंतर पुन्हा नेहाने एक पोस्ट शेअर केली आहे. 'मी अशा नकारात्मक वातावरणात जगू शकत नाही. माझ्यासोबत घडलेला तो प्रकार आता मी विसरले आहे. त्या कार्यक्रमात माझ्यावर केले गेलेले विनोद पाहून त्यावेळी मला खुप राग आला होता. पण, आता मी ती घटना विसरण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या चाहत्यांना विनंती आहे की तुम्ही देखील विसरुन जा. कारण देव सगळं बघत आहे. देवच त्यांना शिक्षा करेल', अशा शब्दात नेहाने आपली नाराजी व्यक्त केली.