मुंबई - गायिका नेहा कक्कड अनेक गाण्यांमुळे लोकप्रिय आहे. तिने गायिलेल्या कर गयी चूल, साखी साखी या गाण्यांना तर अमाप प्रसिध्दी मिळाली आहे. यूट्यूबवर जगात सर्वाधिक पाहिल्या गेल्या स्टारमध्ये तिचा क्रमांक दुसरा लागतो. तिला ४.५ बिलीयन विव्हर्सनी पाहिले आहे. तर पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकन रॅपर कार्डी बी हिला ४.८ बिलीयन विव्हर्सनी पाहिले आहे.
नेहाच्या जगभरातील चाहत्यांनी तिचे व्हिडिओ पाहिल्यामुळे तिला या महत्त्वाच्या स्थानावर विराजमान होता आले आहे. याबद्दल नेहा कक्कडने सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
मनोरंजन विश्वातील आपल्या यशस्वी प्रवासाबद्दल बोलताना नेहा अलिकडे म्हणाली होती, "हे बरं वाटतं. मी लोकांना सांगते की, मी अजूनही स्वप्नातच राहत आहे. हे कसं घडेल? ऋषिकेशमधील एका छोट्या गावातली मुलगी दिल्ली आणि नंतर मुंबईला गेली. ती (यात्रा) चांगली झाली आहे. मी आज तिथं पोहोचली आहे तिथवर येण्याचा विचार मी केला नव्हता. हे आश्चर्यकारक वाटते आणि मला वाटते की, आता मला आयुष्यात आणखी मोठे बनवावे लागेल. मी वयाच्या चौव्या वर्षापासून गाणे सुरू केले आणि 16 पर्यंत मी फक्त भजन संध्या (धार्मिक गाणी) करत होते. जर तुम्ही माझे जागरण फुटेज पाहिले तर , मी तिथेही पार्टी करायचो. मी लहान मुलाप्रमाणे भजनांचे नाच-गाणी करायचे आणि लोक पागल व्हायचे. तेव्हापासून मी पार्टी करत होते. "
अलीकडच्या काळात नेहाने बॉलिवूडच्या अनेक हिट गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. या गायिकेने विशाल दादलानी आणि अनु मलिक यांच्यासमवेत इंडियन आयडल 11 या रियलिटी शोचे सह-परिक्षण केले आणि छोट्या पडद्यावर तिच्या दिसण्याने प्रेक्षकांना मोहीत केले. ती आता आपल्या भावासोबत नव्या गाण्याची तयारी करीत आहे.