मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या चांगल्याच प्रसिद्धीस आल्या आहेत. त्यांनी 'बधाई हो' चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर त्यांच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. आता त्या कंगना रनौतच्या 'पंगा' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांना मिळत असलेल्या संधींबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नीना गुप्ता यांनी 'पंगा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक कविता सादर केली. 'मेरा टाइम आ गया, मेरा टाइम आ गया. फिर मैं सोचूं मेरा टाइम मुझे छोड़कर गया ही कब था? मैं ही लंबी छुट्टी पर थी. काम पर ध्यान दिया ही कब था', या कवितेच्या ओळी म्हणून त्यांनी आता मी फार आनंदी आहे, असे म्हटले.
हेही वाचा -'शहीद भाई कोतवाल' सिनेमात 'हा' अभिनेता दिसणार शहीद गोमाजी पाटलांच्या भूमिकेत