मुंबई - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बराच चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांची पत्नी आलिया यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याला व्हॉट्सअॅप व ईमेलच्या माध्यमातून घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवून सर्वांना चकीत केले होते. आलियाने अनेक मीडिया हाऊसेसना दिलेल्या मुलाखतीत नवाज आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठविली होती, पण अद्याप नवाजने प्रतिसाद दिलेला नाही. उत्तर न मिळाल्याने आलियाने आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
आलियाने ट्विटरवर लिहिलंय, मी आलिया सिद्दीकी आहे. मला ट्विटरवर येऊन सत्य सांगण्यास भाग पाडले गेले आहे, जेणेकरून माझ्याबद्दल गैरसमज होऊ नयेत. आपण बळ वापरुन गप्प करु शकत नाही. सत्य विकत घेऊ शकत नाही किंवा बदलता येत नाही. '
आलिया सिद्दीकीने पुढे लिहिलं आहे की, 'सर्वप्रथम मला हे स्पष्ट करून सांगायचं आहे की, मी कोणत्याही माणसाशी कोणत्याही प्रकारच्या संबंधात नाही, असा दावा करणारा कोणताही मीडिया रिपोर्ट पूर्णपणे खोटा आहे. यावरून असे दिसते आहे की, माझ्या फोटोसह काही मूर्ख दावा करून माध्यमं लोकांचे लक्ष वळवू इच्छित आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, 'मी आता स्वत: साठी उभे राहून बोलणे शिकत आहे, माझ्या मुलांसाठी मी आणखी मजबूत होत आहे. मी आतापर्यंत काहीही चुकीचे केले नाही आणि म्हणून त्रास देखील देत नाही. माझ्या चारित्र्यावर किंवा प्रतिष्ठिततेवर कोणीही बोट ठेवले तर ते मी सहन करणार नाही. पैसा सत्य खरेदी करू शकत नाही.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. 10 वर्षांनंतर आलियाने आता नवाजुद्दीन सिद्दीकीपासून पूर्णपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाचा दावा आहे की, नवाज तिची आणि आपल्या मुलांची काळजी घेत नाही, त्यांचे नातं चांगले नाही, म्हणूनच संबंध खेचण्याऐवजी तिला संपवण्याची सक्ती केली जाते.