मुंबई- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आगामी 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी झळकणार आहे. या चित्रपटात दोघांच्याही लग्नाची हटके गोष्ट पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे.
फर्स्ट लूक पोस्टरमध्ये नवाजुद्दीन आणि अथियाचा लग्नातील लूक पाहायला मिळतो. विदेशात जाण्यासाठी आतुर असलेली अथिया आणि लग्नासाठी उताविळ झालेल्या नवाजुद्दीनची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा - वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नवाजुद्दीन - अथियाच्या 'मोतीचूर चकनाचूर'चा ट्रेलर प्रदर्शित