महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बेबो'च्या फोटोंची नवाजुद्दीनलाही भूरळ, व्यक्त केली 'ही' इच्छा! - sanya malhotra

संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान नवाजुद्दीनला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. यादरम्यान त्याला बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीचा फोटो काढण्याची इच्छा आहे, असे विचारण्यात आले.

नवाजुद्दीन सिद्दिकी

By

Published : Mar 9, 2019, 11:09 PM IST

मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि सान्या मल्होत्रा यांचा'फोटोग्राफ' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अलिकडेच या चित्रपटाच्या संगीत सोहळ्याचेही अनावरण झाले. या कार्यक्रमादरम्यान नवाजने करिना कपूर खान हिचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली.

संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान नवाजुद्दीनला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. यादरम्यान त्याला बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीचा फोटो काढण्याची इच्छा आहे, असे विचारण्यात आले. तेव्हा त्याने लगेच करिना कपूरचे नाव घेतले. याचे कारण सांगताना तो म्हणाला, की 'करिना एक फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिचे फोटो मला खूप आवडतात. तिची फोटो काढताना पोझ देण्याची पद्धत, तिची अदा मला फार आवडते, म्हणून तिचा फोटो काढण्याची इच्छा असल्याचे तो यावेळी म्हणाला.

या कार्यक्रमादरम्यान त्याच्यासोबत सान्या मल्होत्रादेखील उपस्थित होती. सान्याने अलिकडेच'फोटोग्राफ' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडियावर' गेली होती. तिचे मागच्या वर्षी 'पटाखा' आणि 'बधाई हो' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता ती नवाजुद्दीनसोबत 'फोटोग्राफ' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'फोटोग्राफ' चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश बत्रा यांनी केले आहे. येत्या १५ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details