मुंबई- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आगामी 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अथिया पहिल्यांदाच नवाजुद्दीनसोबत पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये दोघांचीही हटके केमेस्ट्री पाहायला मिळते.