पुणे - रुपवेध प्रतिष्ठनच्यावतीने देण्यात येणारा 'तन्वीर सन्मान २०१९' हा पुरस्कार यंदा अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना जाहीर झाला आहे. तर, महाराष्ट्र कल्चरल सेंटरला तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे. ९ डिसेंबरला पुण्यात जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागु यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीर यांचे एका अपघातात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार भारतीय रंगभुमीत महत्वपुर्ण कामगिरी करणाऱया कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे १५ वे वर्ष आहे.