महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

टॉम क्रूझसाठी नासाची स्पेस स्टेशनमध्ये रेड कार्पेट अंथरायची तयारी - नासाने शूटिंगसाठी सुरू केली तयारी

टॉम क्रूझ आता अंतराळामध्ये शूटिंग करताना दिसणार आहे. टॉम आणि अ‌ॅलन मस्क सध्या स्पेस एक्स आणि नासासोबत काम करीत आहेत. टॉम क्रूझला अंतराळात शूटिंग करण्यासाठी नासाने स्पेस स्टेशनमध्ये रेड कार्पेट अंथरायची तयारी केली आहे.

Tom Cruise
टॉम क्रूझ आता अंतराळामध्ये शूटिंग करताना दिसणार

By

Published : May 28, 2020, 3:17 PM IST

केप कॅनावेरल- टॉम क्रूझचा आगामी चित्रपट अंतराळात शूट होणार असल्याचे वृत्त आम्ही यापूर्वी दिले होते. त्यावेळी नासानेही याला दुजोरा दिला होता. आता या प्रक्रियेत प्रगती झाल्याचे दिसते. टॉम क्रूझला अंतराळात शूटिंग करण्यासाठी नासाने स्पेस स्टेशनमध्ये रेड कार्पेट अंथरायची तयारी केली आहे.

अंतराळ एजन्सीचे अॅडमिनिस्ट्रेटर जिम ब्रिडनस्टाईन यांनी बुधवारी स्पष्ट केले की, नासाच्या दोन अंतराळवीरांच्या प्रक्षेपणासाठी स्पेस रॉकेट सज्ज झाले आहे. यापैकी एक टॉम क्रूझ असणार आहे. या मोहिमेबद्दल अधिक तपशील देण्याची जबाबदारी ब्रिडनस्टाईन यांनी क्रूझ आणि स्पेस एक्सवर सोडली आहे.

टॉम क्रूझ आणि त्याच्या टीमशी नासा चर्चा करीत आहे. ही मोहिम यशस्वी पार पडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असेही ब्रिडनस्टाईन यांनी सांगितले.

अंतराळात टॉम क्रूझच्या सिनेमाचे शूटिंग कसे होणार याबद्दल विचारले असता, ब्रिडनस्टाईन यांनी म्हटले की जनतेच्या कल्पनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी नासा नेहमी प्रयत्नशील असते.

ABOUT THE AUTHOR

...view details