मुंबई - नागराज मंजुळेचा पहिला बॉलिवूड चित्रपट झुंड अनेक कारणांनी चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सैराट फेम रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २० सप्टेंबर २०१९ रोजी झुंड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
झुंड चित्रपटाची कथा स्लम फुटबॉल लिगची आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे शिकवत त्यांना व्यसनापासून बाजूला नेणाऱ्या एका कतृत्ववान कोचची आहे. विजय बारसे यांच्या खऱ्या आयउष्यावर बेतलेली ही कथा आहे. ही मध्यवर्ती भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत.