महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सामंथा - नागा चैतन्य घटस्फोटाच्या बातम्यांबद्दल नागार्जुनाने मीडियाला फटकारले - सामंथा चैतन्य विभक्त होण्यावर नागार्जुनाचे म्हणणे

नागा चैतन्य-सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाची चर्चा थांबली असे वाटत असतानाच तेलुगू सुपरस्टार नागार्जुनला गुरुवारी या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला.

नागा चैतन्य-सामंथा रुथ प्रभू
नागा चैतन्य-सामंथा रुथ प्रभू

By

Published : Jan 28, 2022, 12:01 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांनी गुरुवारी ट्विटरवर स्पष्टीकरण दिले की त्यांचा मुलगा नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाबाबतचे त्यांचे विधान "पूर्णपणे खोटे" आहे.

"सामांथा आणि नागचैतन्य यांच्याबद्दलचे माझे विधान असल्याचे दाखवणाऱ्या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निरर्थक आहेत," असे त्यांनी ट्विट केले.

ऑक्टोबर 2021 मध्ये सामंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विभक्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनंतर काही महिन्यांनी एका बातमीने दावा केला होता की नागार्जुनने या जोडप्याच्या घटस्फोटाबद्दल आपले मौन सोडले आहे.

नागार्जुन यांनी मिडीयाला खोट्या बातम्या न पसरवण्याची विनंती केली. "मी मीडिया मित्रांना विनंती करतो की कृपया बातम्या म्हणून अफवा पोस्ट करण्यापासून दूर रहा.," असे नागार्जुन पुढे म्हणाला.

सामांथाने घटस्फोटासाठी नागा चैतन्यवर दबाव आणला होता, असे नागार्जुनाचे मत असल्याचे बातमी मीडियात झळकली होती. तसेच अनेक तेलुगु मीडियाने असेही म्हटले होते की, नागार्जुनने त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती.

जेव्हा नागा चैतन्या आणि सामंथाने त्यांचे जवळजवळ चार वर्षांचे वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा नागार्जुनने नागा चैतन्यला, त्याच्या आणि त्याच्या कौटुंबिक प्रतिष्ठेची काळजी घेण्यास सांगितले होते, असा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र हे सर्व खोटे आणि निरर्थक असल्याचे नागार्जुनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -'बधाई दो'सह एलजीबीटीक्यू+ नात्यावर आधारित बॉलिवूड चित्रपट

ABOUT THE AUTHOR

...view details