मुंबई - सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी, राजकारण हा विषय सर्वांच्याच जवळचा असतो. त्यामुळे राजकारणावर आधारित असलेला 'धुरळा' हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात येऊन धडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातलं पहिलं 'नाद करा' हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
आदर्श शिंदे, आनंद शिंदे यांच्या आवाजाचा तडका या गाण्याला लागला आहे. या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ आणि प्रसाद ओक यांचा अतरंगी डान्सही पाहायला मिळतो.
हेही वाचा -अॅक्शन अवतारासाठी आयुष्यमान करणार चार महिने तयारी
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे त्यांचा हटके लूकदेखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ४८ वे विदर्भ प्रांत अधिवेशनाला सुरुवात, मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन
#पुन्हानिवडणूक या हॅशटॅगमुळे 'धुरळा' चित्रपटाबाबत आधीच फार चर्चा झाली होती. अलका कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ हे कलाकार यामध्ये भूमिका साकारत आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून क्षितीज पटवर्धनने या सिनेमाचं लेखन केलं आहे. ३ जानेवारी २०२० रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर येणार ३ चित्रपट; खासदार कोल्हेंची निर्मिती