प्रेक्षकांना चित्रपटातील नायक-नायिकांच्या नवनवीन जोड्या बघायला आवडतात. त्याचप्रमाणे रुपेरी पडद्यावर प्रथमच एकत्र येणाऱ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहाण्याचं कुतूहल प्रेक्षकांनाही असतं. सध्या वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे मराठी चित्रपट लक्षवेधी ठरतायेत. ‘रौद्र’ या आगामी मराठी चित्रपटातही अशीच एक नवी जोडी जमली आहे. राहुल पाटील आणि उर्मिला जगताप यांची नवी जोडी प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
म्युझिक अल्बम, मालिका ते चित्रपट असा अभिनेत्री उर्मिला जगतापचा प्रवास आहे तर राहुल पाटील याने सुद्धा अल्बम आणि चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे. उर्मिलाने याआधी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘स्पेशल पोलिस फोर्स’ या मालिका तसेच ‘एक सांगायचंय’, ‘ऊसान’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटासोबत ‘इश्क हुआ रे’,‘बँडवाल्या बँड तुझा वाजू दे’ या अल्बम मध्ये राहुलने काम केलं आहे.
रहस्यभेद आणि विनाशाचं ‘रौद्र’ रूप १ एप्रिल पासून चित्रपटगृहांमध्ये! - Rahul Patil and Urmila Jagtap
‘रौद्र’ या चित्रपटाच्या निमित्ताने राहुल पाटील आणि उर्मिला जगताप प्रथमच एकत्र आले असून स्वातंत्र्योत्तर काळातील पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा ते साकारताहेत. या चित्रपटाची कथा रहस्यभेदाभोवती फिरते. एका पुरातन अमूल्य अशा गोष्टीचं रहस्य जाणून घेण्यासाठी गावात आलेला नायक तेथील नायिकेच्या मदतीने त्याचा शोध घेऊ पाहतो. त्रिंबक कुरणे आणि मृण्मयी कुलकर्णी या व्यक्तिरेखा ते साकारत आहेत.
राहुल पाटील आणि उर्मिला जगताप