महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हासू आणि आसू यांचा मिलाफ असलेला 'द स्काय ईझ पिंक' ट्रेलर अखेर रिलीज - फरहान अख्तर

'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. प्रियंका चोप्राचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणारा आणि 'दंगल' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिम हिचा शेवटचा अभिनय असलेला हा चित्रपट आहे.

'द स्काय ईझ पिंक' ट्रेलर

By

Published : Sep 10, 2019, 1:10 PM IST


मुंबई - प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द स्काय ईज पिंक’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. सत्य कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर उत्कंठा वाढवणारा आहे.

सोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिनं लिहिलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित आहे.

'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटाची मागच्या वर्षीच शूटिंग सुरू झाली होती. प्रियांका आणि फरहानने अलिकडेच या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. 'द स्काय ईझ पिंक' सिनेमा अथक परिश्रमांशिवाय खूप साऱ्या प्रेमासोबतही बनवला गेला आहे', असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंवर दिले आहे.

हा चित्रपट 'टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये खूप सारं प्रेम आणि कौतुकाची थाप मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.

'दंगल' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिम हिने अचानक चित्रपटक्षेत्रातून एक्झिट घेतल्यानंतर बरीच चर्चा झाली होती. मात्र, 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटात ती अखेरची पडद्यावर पाहयला मिळणार आहे. या चित्रपटाची 'टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये स्क्रिनिंग होणार आहे.

प्रियांका चोप्रादेखील लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर, फरहान अख्तर देखील त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटाची तयारी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details