हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांचा दमदार अभिनय असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली होती. ट्रेलर पाहून ही उत्कंठा शिगेला पोहोचेल हे निश्चित.
आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची ही कथा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे.