मुंबई - बॉलिवूडची प्रसिध्द दिग्दर्शक जोडी अब्बास मस्तान यापैकी अब्बास यांचा मुलगा मुस्तफा अभिनयाच्या क्षेत्राकडे वळला आहे. मशीन या चित्रपटातून त्याने २०१७ मध्ये पदार्पण केले होते. मात्र हा चित्रपटबॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नव्हता. आता मुस्तफा 'द लास्ट मील' या लघुपटातून पुन्हा स्वतःला आजमावतोय.
बॉलिवूडच्या प्रसिध्द दिग्दर्शकाचा हा मुलगा झळकणार 'द लास्ट मील'मध्ये - short film
दिग्दर्शक जोडी अब्बास मस्तान यापैकी अब्बास यांचा मुलगा मुस्तफा 'द लास्ट मील' या लघुपटातून पुन्हा स्वतःला आजमावतोय. त्याने २०१७ मध्ये पदार्पण केले होते. मात्र हा चित्रपटबॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नव्हता.
मुस्तफा
मुस्तफाने न्यूयॉर्कमध्ये फिल्ममेकींगचे घडे गिरवले आहेत. त्यानंतर त्याने वडिलांसोबत सहाय्यक म्हणून कामही केले आहे. त्याने रंगभूमीवरही काम केले आहे. आता तो 'द लास्ट मील' या लघुपटात झरीना वहाबसोबत काम करीत आहे.
कुमार सिध्दार्थ यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून याचा ट्रेलर लवकरच रिलीज होईल. ७ ऑगस्ट रोजी 'द लास्ट मील' लघुपट रिलीज होणार आहे.