महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुमताजच्या निधनाच्या बातम्या केवळ अफवा, कोमल नाहटांनी मागितली माफी

नाहटा यांनी मुमताज यांच्या निधनाविषयी चुकीची माहिती दिल्याबद्दल ट्विट करत माफी मागितली आहे. मुमताज सध्या लंडनमध्ये असून त्यांची प्रकृतीही ठणठणीत असल्याचे कोमल नाहटा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुमताजच्या निधनाच्या बातम्या केवळ अफवा

By

Published : May 4, 2019, 12:06 PM IST

मुंबई- चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी मुंबईतील एका रुग्णालयात मुमताज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं ट्विट केलं होतं. यानंतर मुमताज यांच्या निधनाची अफवा सगळीकडेच मोठ्या वेगाने पसरली होती. अशात आता या सर्व केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

नाहटा यांनी मुमताज यांच्या निधनाविषयी चुकीची माहिती दिल्याबद्दल ट्विट करत माफी मागितली आहे. मुमताज सध्या लंडनमध्ये असून त्यांची प्रकृतीही ठणठणीत असल्याचे कोमल नाहटा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर याबद्दल बोलताना मुमताज यांनी अशा प्रकारच्या अफवा का पसरवल्या जात आहेत हेच समजत नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच अशा अफवा पसरवून कोणाला काय आनंद मिळतो, असा सवाल करत त्यांनी या अफवांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details