मुंबई -अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची मुख्य जोडी असलेला 'स्माईल प्लीज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगण्याला आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा स्माईल प्लीज हा महाराष्ट्रातच नव्हे तर, सातासमुद्रापार जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी लागली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या आणि वेगवेगळ्या विषयांचा समावेश असलेल्या चित्रपटांची निवड केली जाते. यामध्ये 'स्माईल प्लीज' चित्रपटाचीही वर्णी लागली आहे.