मुंबई - पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पुजेचं खास महत्व असल्याचं पाहायल मिळतं. या महापर्वावर काही दिवसांपूर्वीच लोकसभेची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती यांनी दुर्गा पुजेच्या गाण्यावर डान्स केला आहे. या दोघींच्याही डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या गाण्याला यूट्यूबर आत्तापर्यंत ९ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. तर, फेसबुकवरही १० लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती दोघीही बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री सुभाश्री गांगुलीचाही डान्स या व्हिडिओत पाहायला मिळतो. दुर्गा पूजेचं पर्व ३ ते ८ ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या गाण्याला टॉलीवुड कंपोजर इंद्रदीप दास गुप्ता यांनी कंपोज केलं आहे.
हेही वाचा -'एमी अवार्ड्स २०१९': 'सेक्रेड गेम्स' आणि 'लस्ट स्टोरीज'ला मिळालं नॉमिनेशन
नुसरत जहांने काही दिवसांपूर्वीच बंगाली चित्रपट साईन केला आहे. 'असुर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात बंगाली अभिनेता अबीर चॅटर्जी हा झळकणार आहे.
लोकसभेचे कामकाज सांभाळत तिने प्रोफेशनल जबाबदारी देखील महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर तिने या चित्रपटाचं टीजर पोस्टरही शेअर केलं आहे. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती तिने यामध्ये दिली आहे.
हेही वाचा -'रॉमकॉम' सिनेमाचे अनोखे थ्रीडी पोस्टर सोशल मीडियावर लाँच