वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित चित्रपट ‘झॉलीवूड’! - Zadipatti film ‘Jollywood’
आता एक चित्रपटही येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘झॉलीवूड’, जो वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित आहे. झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटाची कथा आसावरी नायडू, पटकथा तृषांत इंगळे, योगेश राजगुरू यांनी छायांकन वैभव दाभाडे यांनी संकलनाची जवाबदारी सांभाळली आहे.
![वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित चित्रपट ‘झॉलीवूड’! zadipatti](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10996419-692-10996419-1615646239220.jpg)
हॉलिवूड ही अमेरिकेतील लॉस अँजेलिस शहरातील एक भाग असून तिथे बहुसंख्य सिनेमाशी निगडित लोकं राहतात व अनेक चित्रपट निर्मित होतात. हिंदी चित्रपटसृष्टीवर पूर्वी हॉलिवूड चा पगडा होता म्हणून कोणीतरी या सिनेसृष्टीला, जी ‘बॉम्बे’ मध्ये होती, बॉलिवूड म्हणून संबोधित करू लागलं व हे नाव आजतागायत हिंदी चित्रपटसृष्टीला चिकटले आहे. ते नाव तसं आकर्षक असल्यामुळे टॉलिवूड, कॉलिवूड, मॉलीवूड सारखी नाव प्रादेशिक चित्रपटसृष्टींनीं ल्यायली. आता एक चित्रपटही येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘झॉलीवूड’, जो वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित आहे.