मुंबई - ‘समांतर 1 व 2' आणि 'लपछपी'च्या निर्मात्यांची प्रस्तुती असलेला 'बळी' हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर 9 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक डी. निशाणदार यांनी चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करीत चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज केला आहे.
'बळी’ची या अगोदर दोन पोस्टर प्रदर्शित केली गेली होती. त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपट कधी येतोय, अशी विचारणा सुरू झाली आहे. हॉरर चित्रपट म्हटला की विशाल फुरियापेक्षा आणखी चांगला पर्याय काय असू शकतो? हा चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना एक वेगळा आणि अभूतपूर्व असा अनुभव मिळवून देईल, हे आम्ही नक्की सांगू शकतो. स्वप्निल जोशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ऊसासे टाकणाऱ्या आवाजातील एका आईचे आर्त उद्गार कानी पडतात. काही सेकंदांतच अंगावर काटे आणणारे प्रसंग घडत जातात. एक स्त्री ‘बाSSळा’ अशी आर्त हाक घालते आहे. त्यानंतर या चित्रपटाचा नायक एका पडक्या वाडारुपी रुग्णालयात कुणाचातरी शोध घेताना दिसतो. ‘मी इथेच आहे बाळा,’ असा त्या आईचा काहीसा घाबराघुबरा आवाज ऐकू येतो. ती आई ‘घाबरू नकोस...’ म्हणत आपल्या बाळाला धीर देवू पाहते. त्या पाठोपाठ ‘एलिझाबेथSS’ अशी हाक ऐकू येते. ही एलिझाबेथ कोण, त्यातील आईचे आणि तिचे काही नाते आहे का? चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी कुणाचा शोध घेत आहे, हे ‘बळी’ चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.
विशाल फुरिया दिग्दर्शित आणि स्वप्नील जोशी अभिनित ‘बळी’ हा हॉरर चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर 9 डिसेंबर रोजी पाहता येणार आहे.
हेही वाचा - पराग अग्रवाल प्रकरणी नेटिझन्सना श्रेया घोषालने नम्रपणे सुनावले खडे बोल!