महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मौनी रॉयचा 'हा' फोटो पाहून नेटकरी म्हणतात 'प्लास्टिक की दुकान' - viral photo

सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगदरम्यान मौनी रॉयचा हा लूक पाहायला मिळाला. तिचा हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्या लूकवरुन प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

मौनी रॉयचा 'हा' फोटो पाहून नेटकरी म्हणतात 'प्लास्टिक की दुकान'

By

Published : Jun 6, 2019, 1:32 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी मौनी रॉय अलिकडे तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. मौनी रॉयचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीही मिळते. मात्र, अलिकडेच एका फोटोमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, मौनी रॉयने अलिकडेच तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली आहे. या प्लास्टिक सर्जरीमुळे तिचा लूक पूर्णत: वेगळा दिसत आहे. तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला फार ट्रोल केले आहे.

मौनी रॉय

सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगदरम्यान मौनी रॉयचा हा लूक पाहायला मिळाला. तिचा हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्या लूकवरुन प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कोणी तिला 'प्लास्टिक' म्हटले आहे. तर, कोणी तिला 'प्लास्टिक की दुकान' असे म्हटले आहे.

मौनी रॉय अलिकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बोले चुडीयां' चित्रपटातून बाहेर पडली आहे. सध्या ती 'नागीन-३' मालिकेच्या ग्रॅन्ड फिनालेसाठी शूटिंग करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details