महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मौनी रॉय तीन महिन्यांपासून अडकलीय अबू धाबीमध्ये, घरी परतण्यास झालीय आतुर - mouni wants to return to india

अभिनेत्री मौनी रॉय तीन महिन्यांपासून अबू धाबी येथे तिच्या बालपणीच्या मैत्रिणीबरोबर चांगला वेळ घालवत आहे, तिला घरी आपल्या कुटुंबात परत जायचे आहे.

Mouni Roy
अभिनेत्री मौनी रॉय

By

Published : Jul 8, 2020, 2:38 PM IST

मुंबईः अभिनेत्री मौनी रॉय अबू धाबीमध्ये तिच्या जिवलग मैत्रिणीसोबत राहून तीन महिने उलटून गेली आहेत. तरीही, तिच्या बालपणीच्या मैत्रिणीसह घालवलेल्या मौल्यवान क्षणांना अभिवादन करून, तिने कुटुंबात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिला आता भारतात परतायचे आहे.

एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मौनी म्हणाली, "मी येथे राहण्याचा आनंद घेत आहे, जिच्यासोबत मी लहानाची मोठी झाले त्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या कुटुंबासोबत राहात आहे. माझी आई आणि बाऊ कूच बिहार (पश्चिम बंगाल) मध्ये राहात आहेत. त्यांच्याकडे परतण्यासाठी मी आतुर झाली आहे. परंतु मी अद्याप परतीची तारीख निश्चित केलेली नाही. "

मेड इन चायना फेम अभिनेत्री मौनी आपल्या मैत्रिणीच्या कुटूंबियांसह बराच काळ युएईमध्ये आहे. ती घराबाहेर पडलेली नाही, कारण तिला कोणतीच रिस्क घ्यायची नाही. ती किराणासामान आणण्यासाठीच एकदोनदा घराबाहेर पडली होती.

दरम्यान, मौनी आपल्या आईकडून फोनवरुन पारंपारिक बंगाली पदार्थ बनवण्यास शिकत आहे. या पूर्वी तिला स्वयंपाकघरात प्रवेश करण्याची आवड नव्हती परंतु प्रत्येक दिवसाबरोबर तिने तिच्या स्वयंपाकाच्या कौशल्यांचा प्रयोग केला आहे.

हेही वाचा - किंग खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर.. राजकुमार हिरानींच्या आगामी सिनेमात शाहरुख खान

बंगाली खाद्यपदार्थाचे नाव सांगत मौनी म्हणाली की ती आता बंगाली अंड्याची कढी बनवू शकते, पोस्टो, फूल कोपिर डालना आणि बंगाली सोयाबीन तयार करू शकते.

वर्क फ्रंटवर मौनी नंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. यी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित, आगामी हा अॅक्शन फँटसी चित्रपट करण जोहर निर्मित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details