मुंबई - 'बायपास रोड' या आगामी चित्रपटाचे आकर्षक मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. नील नितीन मुकेश याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलचा भाऊ नमन मुकेश करीत आहे. नमन मुकेशचा हा दिग्दर्शकिय पदार्पणाचा चित्रपट आहे.
पाहा, 'बायपास रोड' चित्रपटाचे आकर्षक मोशन पोस्टर - Neil Nitin Mukesh in Bypass Road
'बायपास रोड' या आगामी चित्रपटाचे आकर्षक मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट १ नोव्हेबंरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
बायपास रोड
'बायपास रोड' या चित्रपटाचा प्रचार 'किलर थ्रिलर' या हॅशटॅगने सुरू झालाय. या चित्रपटाची अगोदर जी पोस्टर्स प्रसिध्द झाली त्यावर या हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता. नील नीतिन मुकेशसोबत अधा शर्मा ही अभिनेत्री काम करीत असून गुल पनंग, शमा सिकंदर, रजीत कपूर, सुधांशू पांडे, मनिष चौधरी आणि ताहेर शब्बीर यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.
'बायपास रोड' हा चित्रपट १ नोव्हेबंरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.