महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 30, 2021, 8:18 PM IST

ETV Bharat / sitara

बुतशिकन जावळी : अनोख्या नावाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झाले प्रदर्शित!

मराठीमध्ये हॉरर, रहस्यमय, थ्रिल असलेले चित्रपट फारच कमी बनले जातात. त्याची उणीव भरून काढण्यासाठी ‘बुतशिकन जावळी’ अशा अनोख्या नावाचा एक नवीन मराठी चित्रपट येऊ घातलाय. नुकतेच बुतशिकन जावळी या आगामी मराठी चित्रपटाचे अतिशय अनोखे असे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

बुतशिकन जावळी

बुतशिकन जावळी हा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या प्रसंगानंतर घडणाऱ्या घटनांचा काल्पनिक विस्तार करतो. ऐतिहासिक प्रसंगावर आधारित काल्पनिक चित्रपट अशी टॅग लाईन असलेले हे मोशन पोस्टर कुतूहल निर्माण करत आहे. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत अभिमन्यू डांगे.

बुतशिकन जावळी

अभिमन्यू डांगे यांनी गॉनकेश (२०१९), हॅंडओवर (२०११) या चित्रपटांचे छायांकन देखील केले आहे. तसेच त्यांनी छायांकन केलेल्या ‘मी वसंतराव’ ह्या चित्रपटाची IIFI २०२१ या प्रख्यात चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. FTII या संस्थेतून छायांकनाचे प्रशिक्षण घेतले आहे. यापूर्वी अभिमन्यू डांगे यांना ‘कातळ’ या लघुपटाच्या छायांकनासाठी ‘दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

‘बुतशिकन जावळी’ या चित्रपटा बद्दलची इतर सर्व माहिती अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा - 'मे डे' चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘रनवे ३४’ करण्यामागचे अजय देवगणने सांगितले कारण

ABOUT THE AUTHOR

...view details