महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे यांचा 'जीव झाला बाजिंद'!

'जीव झाला बाजिंद' साठी मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे एकत्र आले असून या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलेले असून मयूर सुकाळे यांनी गायले आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे.

जीव झाला बाजिंद
जीव झाला बाजिंद

By

Published : Oct 11, 2021, 4:05 PM IST

यावर्षी सण साजरे करायला मिळत असल्यामुळे नवरात्रीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच या महिन्यात दीडेक वर्षांनंतर महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडणार असल्यामुळे मनोरंजनसृष्टीत आनंदीआनंद आहे. प्रेक्षकांबरोबरच कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांच्यात उत्साह दिसून येतोय. टेलिव्हिजनवर आणि सिनेमांत झळकणारी सुंदर, निरागस आणि कमाल अभिनय करणारी अभिनेत्री मोनालिसा बागल प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे म्युझिकल भेट ज्यामुळे सर्वजण म्हणणार 'जीव झाला बाजिंद'

मोनालिसा बागल

'जीव झाला बाजिंद' साठी मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे एकत्र आले असून या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे. आतापर्यंत मोनालिसाने वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे तिच्या अभिनयातला वेगळेपणा जाणवला आणि तिची मेहनत प्रेक्षकांना दिसली आणि म्हणूनच प्रेक्षक तिच्यावर प्रेम करतात. मोनालिसा आता पुन्हा एकदा एका वेगळ्या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आली आहे, नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचं, गावरान बाज असलेल्या 'जीव झाला बाजिंद' या गोड आणि नव्या गाण्यातून.

गावाकडची प्रेमकथा सांगणाऱ्या या गाण्यात मोनालिसा सोबत अभिनेते विठ्ठल काळे झळकणार आहेत. हे गाणं एक वेगळा अनुभव नक्कीच देऊन जाईल. विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला आहे. या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलेले असून मयूर सुकाळे यांनी गायले आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे.

मोनालिसा बागल

एकूणच गावाकडचे वातावरण, दोन कलाकारांमधील केमिस्ट्री, गाणं, आवाज-संगीत आणि शब्द या सगळयाने तुम्हा सर्वांचा जीव बाजिंद होणार आहे हे नक्की. 'जीव झाला बाजिंद' हे गाणं 'मराठी Originals' या यूट्यूब चॅनेलवर पाहावयास मिळेल.

हेही वाचा - BIG B BIRTHDAY बॉलीवुडचे बादशाह अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस, 'या' सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर गाजविले अधिराज्य

ABOUT THE AUTHOR

...view details