मुंबई- मल्ल्याळम अभिनेता मोहनलाल, तमिळ अभिनेता धनुष आणि तेलुगू कलाकार नानी यांच्या हस्ते ‘पेंग्विन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. पेंग्विन हा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्ती सुरेश यांचा आगामी थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोबतच मल्ल्याळम भाषेतही डब केला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहे बंद असल्याने हा चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाच्या टीमला मोहनलाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, धनुषने ट्विट केलं आहे, की एका आईचा असाधारण प्रवास सुरु होत आहे. पेग्विंगनचा ट्रेलर प्रदर्शित करताना आनंद झाला. सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. नानी यांनीही ट्विट करत टीमला शुभेच्छा दिल्या.