आकर्षक फर्स्ट लूकमुळे लक्ष वेधून घेतलेल्या अजय फणसेकर दिग्दर्शित 'सिनियर सिटीझन' याचित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं.
"सिनियर सिटीझन"मध्ये मोहन जोशी प्रमुख भूमिकेत - सिनियर सिटीझन
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत असलेल्या 'सिनियर सिटीझन' या अजय फणसेकर दिग्दर्शित चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजू सावला क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते, बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.
अतिशय दमदार अशा लूकमध्ये मोहन जोशी या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची कथा काय हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच वाढणार हे निश्चित. अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.