महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शिवाजी महाराज यांची मोदींशी तुलना करणे चुकीचे - विक्रम गोखले

अभिनेता विक्रम गोखले यांना 'पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड' देत सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मते मांडली आहेत. अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलंय.

vikram-gokhale
विक्रम गोखले

By

Published : Jan 15, 2020, 8:06 PM IST


पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे १८ वर्षे असून अभिनेते विक्रम गोखले यांना 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड' देत सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मते मांडली आहेत. अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलंय. पुरस्कार महत्वाचा असून भावनात्मक पुरस्कार आहे, असे गोखले म्हणाले.

सरकार मान्य सेन्सॉरशिप योग्य आहे. पण वेब सिरीजसाठी सेन्सॉरशिप नाही हे योग्य नाही. यीची गैरफायदा घेतला जात आहे. माञ खासगी सेन्सॉरशीप नकोच, आम्हाला सिनेमा दाखवा आणि त्यानंतर तुम्ही तो दाखवा हा गाढवपणा आहे. माञ वेब सिरीज गैरफायदा घेत असून त्याचं दुष्परिणाम होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

सर्व कलाकार एकत्र येतात हे स्वप्नवत वाटते, त्यांनी धाडस लागते हे महत्त्वाचं, मात्र तसे होत नाही. काही कलाकार असुरक्षित समजतात.

देशात जात धर्म उपजत असून वाईट आणि घाण आहे. मी स्वतः हिंदू ब्राम्हण म्हणून घेत नाही. लोकांना शहाणे करुन सोडणे हे महत्त्वाचं, असेही ते पुढे म्हणाले.

मी सावकार भक्त आहे, मी अभ्यास केला. ज्यांना सावरकर कळले नाही, ते वाद निर्माण करत आहे. नेते वाद पेटते ठेवत आहेत. सोनिया गांधी यांना सावरकर माहीत नाही. त्यांना त्यांच्या वर बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी यांना पण अधिकार नाही. काही जण शिव्या देतात. सावरकर देव नाही तर माणूस होते. गांधी, सावरकर यांची चूक होऊ शकते, ब्राम्हण आरक्षण नको आम्ही बुद्धीवर जगू, असेही विक्रम गोखले म्हणाले.

शरद पवार हे एक व्हिजन आहेत. त्यांना जाणता राजा असे म्हणणार नाही. तर महाराज यांची मोदींशी तुलना चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण मोदी भक्त किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचेही गोखले यांनी सांगितले.

महोत्सवाच्या परंपरेनुसार विक्रम गोखले यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details