मुंबई -सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या पुरस्काराचा मनसेच्या चित्रपट सेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. अदनान सामी यांचा 'पद्मश्री' पुरस्कार मागे घ्या, अन्यथा त्यांचे यापुढील कार्यक्रम उधळण्यात येतील, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
अदनान सामी यांना ४ वर्षांपूर्वी भारताचे नागरिकत्व मिळाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी १६ वर्षे भारतात राहून कर भरला नाही. येथे कमावलेला पैस त्यांनी दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवून तेथे कर भरला. हेच पैसे भारतावर होणाऱ्या अतिरेकी कारवाईसाठी पाकिस्तान वापरत असतो, असे आरोप अमेय खोपकर यांनी केले.