महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

5 एप्रिलला 'पीएम नरेंद्र मोदी' रिलीज झाल्यास 'खळ्ळ खट्याक' - शालिनी ठाकरे - NCP

5 एप्रिलला पीएम नरेंद्र मोदी रिलीज झाल्यास मनसे 'खळ्ळ खट्याक' करणार..सत्ताधारी पक्षच आचारसंहितेला तिलांजली देत असल्याचा शालिनी ठाकरेंचा आरोप..काँग्रेस, राष्ट्रवादी, डीएमकेनंतर आता मनसेचा सिनेमाला विरोध...

पीएम नरेंद्र मोदी' रिलीज झाल्यास 'खळ्ळ खट्याक

By

Published : Mar 23, 2019, 5:21 PM IST

Updated : Mar 23, 2019, 6:56 PM IST

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर ५ एप्रिलला रिलीज होणार आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याची भूमिका मनसे प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने घेतली आहे. संघटनेच्या शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर निवेदन देत भाजपच्या प्रचाराचा जाहीर निषेध केला आहे.

शालिनी ठाकरे आपल्या निवेदनात म्हणतात, ''गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी मोदी-भाजप सरकारने सरकारी योजनांच्या प्रचारासाठी अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेमकथा आणि पॅडमॅन या दोन सिनेमांना पक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला होता. या घटनेला एक वर्ष उलटत नाही तोच आणखी एक मोठा 'पराक्रम' भाजपवाल्यांनी करून दाखवला आहे.

''विवेक 'आनंद' ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या प्रचारकी सिनेमाची गाणी ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिल्याचं जाहीर करण्यात आलं. सिनेमाच्या अधिकृत पोस्टरवर तसा त्यांचा नामोल्लेख करण्यात आला. महत्वाची गोष्ट ही की, जावेद अख्तर आणि समीर या दोघांनीही या सिनेमासाठी गीतलेखन केलेलं नाही. तसं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे.

''समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या सिनेमाच्या 'पडद्यामागील' लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करते.

आणखी एक गोष्ट. हा सिनेमा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असा पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळ्ळ-खटॅक करावं लागेल!''

Last Updated : Mar 23, 2019, 6:56 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details