महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मिलींद सोमणची आईदेखील फिटनेस फ्रिक, ८० व्या वर्षीही केले पुश अप्स - international mothers day

'हा व्हिडिओ सर्व मातांसाठी आहे. प्रत्येक आईने स्वत:साठी पाच मिनिटे, दहा मिनिटे तरी वेळ काढा. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सुपरफिट पाहायचे आहे.' असेही तो व्हिडिओत म्हणताना दिसतोय.

मिलींद सोमणची आईदेखील फिटनेस फ्रिक, ८० व्या वर्षीही केले पुश अप्स

By

Published : May 13, 2019, 11:51 AM IST

Updated : May 13, 2019, 11:59 AM IST

मुंबई - तरूणाईचा फिटनेस आदर्श म्हणून मिलिंद सोमण याची ओळख आहे. मॉडेलिंगमधून मिलिंदने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सोशल मीडियामध्ये नेहमी तो त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. मात्र, त्याच्या या फिटनेसमागचे रहस्य त्याने एका व्हिडिओद्वारे उलगडले आहे. त्याच्यासाठी त्याची आई उषा सोमण ही प्रेरणा आहे. ८० व्या वर्षीही त्याची आईदेखील एकदम फिट आहे. मिलिंदने त्याच्या आईसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची आईदेखील पुश अप्स करताना दिसत आहे.

मिलींद सोमणची आईदेखील फिटनेस फ्रिक, ८० व्या वर्षीही केले पुश अप्स

'कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खूप उशीर झालेला नसतो. उषा सोमण...माझी आई...८० वर्षांची तरुण... आपली आई आणि इतर सर्वांची काळजी घेते, पण अनेकदा स्वत:ची काळजी घेण्याकडे लक्ष देत नाही. आपल्या आईला तिच्या स्वत:साठी काही वेळ काढण्यासाठी प्रोत्साहित करा, प्रत्येक दिवसाला 'मदर्स डे बनवा'', असे कॅप्शनही त्याने व्हिडिओला दिले आहे.

'हा व्हिडिओ सर्व मातांसाठी आहे. प्रत्येक आईने स्वत:साठी पाच मिनिटे, दहा मिनिटे तरी वेळ काढा. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सुपरफिट पाहायचे आहे.' असेही तो व्हिडिओत म्हणताना दिसतोय.
१२ मे रोजी जागतिक मातृत्व दिन होता. या दिवसानिमित्त अनेक कलाकारांनी आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Last Updated : May 13, 2019, 11:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details