मुंबई- बॉलिवूडमध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आवाज देणारा मिका सिंग लवकरच एका मराठी गाण्याला आवाज देणार आहे. येरे येरे पैसा असं या गाण्याचं शीर्षक असणार आहे. मिका सिंगनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
या गाण्याच्या काही ओळी गात मी मराठी माणसाठी, जय महाराष्ट्र असे तो म्हणताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि हेमंत ढोमेदेखील दिसत आहेत. गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वी स्टूडिओमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे. संजय जाधवद्वारा दिग्दर्शित 'येरे येरे पैसा' या मराठी सिनेमाला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.