महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मायकल जॅक्सनच्या बायोपिकचे शुटिंग लायन्सगेट येथे सुरू - मायकल जॅक्सन जीवनपट

निर्माता ग्रॅहम किंग या वेळी दिवंगत पॉप लिजेंड मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवणार आहेत. लायन्सगेट या चित्रपटाच्या जगभर वितरणाची जबाबदारी पाहणार आहे.

मायकल जॅक्सनच्या बायोपिकचे शुटिंग
मायकल जॅक्सनच्या बायोपिकचे शुटिंग

By

Published : Feb 8, 2022, 6:01 PM IST

वॉशिंग्टन (यूएस) - हॉलिवूडमधील प्रतिष्ठीत एंटरटेन्मेंट कंपनी असलेल्या लायन्सगेटने दिग्गज गायक-नर्तक मायकल जॅक्सन यांच्या जीवनावर आधारित मायकल या चित्रपटाचे जगभरातील हक्क घेतले आहेत. हा स्टुडिओ निर्माता ग्रॅहम किंग आणि त्याच्या GK फिल्म्स सोबत मायकेलवर काम करेल. हा चित्रपट मायकेल जॅक्सन इस्टेटचे सह-निर्माता जॉन ब्रँका आणि जॉन मॅकक्लेन यांनी संयुक्तपणे बवण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्माता ग्रॅहम किंग या वेळी दिवंगत पॉप लिजेंड मायकेल जॅक्सनच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवणार आहेत. लायन्सगेट या चित्रपटाच्या जगभर वितरणाची जबाबदारी पाहणार आहे.

निर्मात्यांनी पॉपचा किंग बनलेल्या क्लिष्ट मायकलचे सखोल चित्रण करण्याचे वचन दिले आहे. या बायोपिकमधून जॅक्सनच्या सर्वात प्रतिष्ठित कामगिरीला जिवंत करुन कलात्मक आणि वैयक्तिक जीवनाबद्दलचे माहितीपूर्ण दर्शन घडेल.

या चित्रपटात द जॅक्सन फाइव्ह, पॉप सुपरस्टारडममध्ये झालेली वाढ आणि बाललैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे उद्भवलेल्या दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटल्यांसह कायदेशीर संघर्ष यांचा समावेश असेल. जॅक्सनचे 2009 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले होते.

टोनी अवॉर्ड विजेते जॉन लोगन मायकलसाठी पटकथा लिहिणार आहेत. जॉन लोगन आणि किंगने यापूर्वी मार्टिन स्कोर्सेसच्या द एव्हिएटरमध्ये सहयोग केला होता. जॅक्सन इस्टेट आणि लोगन यांच्या सहकार्याने किंगचा बायोपिक 2019 मध्ये पहिल्यांदा जाहीर करण्यात आला होता परंतु लायन्सगेटच्या आगमनापर्यंत स्टुडिओ जोडणे बाकी होते.

हेही वाचा -'गहराइयाँ' प्रमोशनमध्ये तुम्हाला कोण जास्त आवडलं, दीपिका की अनन्या?

ABOUT THE AUTHOR

...view details