यवतमाळ - 'मेरा भोला है भंडारी ' फेम आणि हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध गायक बाबा हंसराज रघुवंशी यांच्या जगरात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथील श्याम टॉकीज चौकात हा कार्यक्रम होणार आहे. 'जय संतोषी माता' मंडळातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या ५० वर्षांपासून जय संतोषी माता मंडळाने जिल्हावासींच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. आकर्षक देखावे आणि मातेची मूर्ती यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. यंदा मंडळातर्फे हिमाचल प्रदेश येथील सुप्रसिद्ध गायक बाबा हंसराज रघुवंशी यांचा जगराता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.