महाराष्ट्र

maharashtra

'किंग खान'ला मेलबर्न विद्यापीठाकडून 'डॉक्टरेट' पदवी बहाल

By

Published : Aug 10, 2019, 11:00 AM IST

शाहरुखने त्याच्या आईच्या नावाने सुरू केलेल्या मीर संस्थेद्वारा सामाजिक कार्य केली आहेत. या संस्थेद्वारा तो महिला सशक्तीकरण तसेच, अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी काम करत असतो.

'किंग खान'ला मेलबर्न विद्यापीठाकडून 'डॉक्टरेट' पदवी बहाल

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये शाहरुखचा 'डॉक्टरेट' पदवी देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
शाहरुखने मेलबर्न येथील 'ला ट्रोब' विद्यापीठातून ही पदवी मिळवली आहे. त्याने केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्याला डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.

शाहरुखने त्याच्या आईच्या नावाने सुरू केलेल्या मीर संस्थेद्वारा सामाजिक कार्य केली आहेत. या संस्थेद्वारा तो महिला सशक्तीकरण तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी काम करत असतो.

शाहरुखच्या या कार्यासाठी त्याला डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सध्या मेलबर्न येथे आयोजित 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये शाहरुखला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हा सोहळा १८ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details