महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रणवीर सिंगसोबत 'मल्हारी' गाण्यावर थिरकला मिजान, व्हिडिओ व्हायरल - malhari

अलिकडेच एका लग्नसमारंभात बऱ्याच बॉलिवूड कलाकरांनी हजेरी लावली होती. यावेळी रणवीर सिंगदेखील उपस्थित होता. त्याने या कार्यक्रमात त्याच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील 'मल्हारी' गाण्यावर डान्स केला.

रणवीर सिंगसोबत 'मल्हारी' गाण्यावर थिरकला मिजान, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jul 4, 2019, 12:09 PM IST

मुंबई -दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'मलाल' चित्रपटातून जावेद जाफरींचा मुलगा मिजान हा बॉलिवूड पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शरमिन सेहगल ही नवोदीत अभिनेत्री देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

अलिकडेच एका लग्नसमारंभात बऱ्याच बॉलिवूड कलाकरांनी हजेरी लावली होती. यावेळी रणवीर सिंगदेखील उपस्थित होता. त्याने या कार्यक्रमात त्याच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील 'मल्हारी' गाण्यावर डान्स केला. त्याच्यासोबत मिजाननेही ठेका धरला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणवीर आणि मिजान एकमेकांना 'पद्मावत' चित्रपटापासून ओळखतात. मिजानने या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली होती. या चित्रपटाची एक आठवण त्याने सांगितली आहे. एका माध्यमाशी बोलताना त्यांने सांगितले, की 'पद्मावत' चित्रपटाच्या काही भागांच्या शुटिंगदरम्यान रणवीरला दुसरे काम असल्यामुळे संजय लीला भन्साळी यांनी मिजानलाच रणवीरची भूमिका साकारण्यासाठी सांगितले होते. या चित्रपटातील दोन सीन हे मिजानवर शूट झाले आहेत. याचा खुलासा खुद्द मिजाननेच केला आहे.

मिजान आता 'मलाल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, मंगेश हडवळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. उद्या म्हणजे ५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details