मुंबई -बॉलिवूडला आजवर सुपरहिट चित्रपट देणारे आघाडीचे दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांची ओळख आहे. त्यांनी रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, प्रियांका चोप्रा आणि इतर बऱ्याच कलाकारांना शुन्यातून वर आणले आहे. मात्र, त्यांच्या निर्मितीखाली तयार झालेला 'मलाल' चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ढासळला आहे.
'मलाल' चित्रपटातून संजय लीला भन्साळी यांनी दोन नव्या चेहऱ्यांना ब्रेक दिला. जावेद जाफरींचा मुलगा मिजान आणि संजय यांच्या बहिणीची मुलगी शर्मिन सेहगल दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. मात्र, त्यांच्या जोडीची छाप प्रेक्षकांवर पडली नाही. पहिल्या दिवशी समोर आलेल्या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावरून हे स्पष्ट होते.