महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार 'मीडियम स्पाइसी' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर - मराठी सिनेमा 'मीडियम स्पाइसी'

बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा 'मीडियम स्पाइसी' गेल्यावर्षी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वच चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळापत्रकं कोलमडली आणि ‘मीडियम स्पाइसी' चे प्रदर्शनही पुढे गेले. आता हा चित्रपट नॉर्वे बॉलिवूड महोत्सवात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेले १९ वर्ष हा बॉलिवूड महोत्सव साजरा केला जातो. यंदा 'मीडियम स्पाइसी' सिनेमाचा ‘वर्ल्ड प्रीमियर नॉर्वे मध्ये होणार आहे. ‌

'मीडियम स्पाइसी' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर
'मीडियम स्पाइसी' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर

By

Published : Sep 18, 2021, 10:59 PM IST

सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा 'मीडियम स्पाइसी' गेल्यावर्षी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वच चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळापत्रकं कोलमडली आणि ‘मीडियम स्पाइसी' चे प्रदर्शनही पुढे गेले. परंतु त्यामुळे तो इतर ठिकाणी प्रदर्शित होऊ शकत नाही असे नक्कीच नाही. आता हा चित्रपट नॉर्वे बॉलिवूड महोत्सवात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेले १९ वर्ष हा बॉलिवूड महोत्सव साजरा केला जातो. यंदा 'मीडियम स्पाइसी' सिनेमाचा ‘वर्ल्ड प्रीमियर नॉर्वे मध्ये होणार आहे. ‌

नॉर्वे बॉलिवूड फेस्टिव्हल हा अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील कलाकारांना त्यांच्या अद्भुत योगदानाबद्दल सन्मानित करतात. याआधीच्या महोत्सवात सलमान खान, विद्या बालन, हेमा मालिनी, अनिल कपूर, डेव्हिड धवन, मधुर भांडारकर आणि बोमन इराणीसारख्या काही कलाकारांनी हजेरी लावली होती.

'मीडियम स्पाइसी' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर

मोहित टाकळकर दिग्दर्शित, मीडियम स्पाइसी हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता तसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “खरंतर, कलेला सीमा नसतात, तसंच चित्रपट महोत्सव आपल्याला चित्रपटांद्वारे आपल्या कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्याची संधी देतात. आम्ही प्रेक्षकांसाठी सिनेमा प्रदर्शित करण्याची वाट पाहत होतो. तर, आता नॉर्वेमध्ये 'मीडियम स्पाइसी'चे पहिले स्क्रीनिंग करण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत.”

नॉर्वेमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल मोहित टाकळकर म्हणाले, “एक दिग्दर्शक म्हणून, आमचा सिनेमा साता समुद्रापार चालला आहे हे बघून अत्यंत समाधान वाटतं. खरंतर जेव्हा आम्ही हा सिनेमा बनवला, तेव्हा या सिनेमाने त्याच्या प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त ठिकाणी प्रवास करावा अशी आमची इच्छा होती‌. माझ्या सिनेमाच्या टिमला आणि निर्मात्यांना आशा आहे की 'मीडियम स्पाइसी' सिनेमा महोत्सवात चांगलाच स्वाद आणेल.”

भारतात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी, 'मीडियम स्पाइसी' या सिनेमाचे मुख्यतः पुण्यात आणि मुंबईतील काही ठिकाणी चित्रीकरण झाले. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.

हेही वाचा - कॅटरिना कैफने शेअर केला थक्क करणारा आकर्षक व्हिडिओ

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details