महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गुगल इंडियाचे सीईओ पद भूषवणाऱ्या मयुरी कांगोचा थक्क करणारा जीवनप्रवास - acting

मयुरी कांगो गुगल इंडियाच्या इंडस्ट्रीयल हेड म्हणून कार्यरत झाली आहे. इतक्या उच्च पदावर विराजमान होण्याची एका अभिनेत्रीची ही पहिलीच वेळ आहे. औरंगाबादची रहिवासी असलेल्या या मराठमोळ्या मुलीला मिळालेला हा सन्मान निश्चितच कौतुकास पात्र आहे.

गुगल इंडियाचे सीईओ पद भूषवणाऱ्या मयुरी कांगोचा थक्क करणारा जीवनप्रवास

By

Published : Apr 5, 2019, 10:56 PM IST


मयुरी कांगो गुगल इंडियाच्या इंडस्ट्रीयल हेड म्हणून कार्यरत झाली आहे. इतक्या उच्च पदावर विराजमान होण्याची एका अभिनेत्रीची ही पहिलीच वेळ आहे. औरंगाबादची रहिवासी असलेल्या या मराठमोळ्या मुलीला मिळालेला हा सन्मान निश्चितच कौतुकास पात्र आहे. अशा या मयुरीचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे.

औरंगाबादच्या सेंट झेवीयर स्कूलमध्ये तिचे शालेय शिक्षण पार पडले. त्यानंतर देवगिरी कॉलेजमधून ती ग्रॅज्यूएट झाली. तिचे वडील भालचन्द्र कांगो हे लढाऊ कम्युनिस्ट नेते आणि शहरातील नामवंत डॉक्टर आहेत. केवळ २ रुपयात उपचार करणाऱ्या या डॉक्टरांचा गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळायचा. आज जरी ते मेडिकल प्रॅक्टीस करीत नसले तरी त्यांचा नाव लौकिक मोठा आहे.

मयुरीला अभिनय क्षेत्राची ओढ आई सुजाता कांगो यांच्यामुळे लागली. त्या नाटकाच्या उत्तम अभिनेत्री आहेत. आईच्या प्रेरणेतूनच ती सिनेक्षेत्राकडे वळली. आईच्या भेटीसाठी मुंबईत आलेली मयुरी दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्या संपर्कात आली. मिर्झा यांनी तिच्यातील प्रतिभा हेरली आणि 'नसिम' या चित्रपटातून तिने १९९५ मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. बाबरी मशिदीचा ढाचा तोडल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हा बॉलिवूड चित्रपट होता. खरेतर त्यावेळी ती १२ वीत होती. त्यामुळे हा चित्रपट स्वीकारण्यास ती तयार नव्हती. मात्र मिर्झा यांनी तिच्याशी चर्चा करुन मार्ग काढला आणि तिने ही भूमिका स्वीकारली.

नसिम चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे दिग्दर्शक महेश भट्ट प्रभावित झाले. त्यांनी तिला १९९६ मध्ये आलेल्या 'पापा कहते है' या चित्रपटात मुख्य भूमिका देऊ केली. बॉक्स ऑफिसवर फार कमाई होऊ शकली नाही परंतु यातील तिचा अभिनय मात्र सर्वांचे लक्ष वेधून गेला. यातील "घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही, रस्ते में है उसका घर" हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. यात जुगल हंसराज याने नायकाची भूमिका साकारली होती.

यानंतर मयुरी 'बेताबी', 'होगी प्यार की जीत' आणि 'बादल' या सिनेमातून झळकली. त्यानंतर तिने डॉलर बहु आणि करिश्मा- द मिरॅकल्स ऑफ डेस्टीनी या टीव्ही मालिकातून भूमिका साकारल्या.

पुढे तिने अमेरिकेच्या आदित्य धिल्लाँ याच्यासोबत २८ डिसेंबर २००३ साली औरंगाबाद येथे विवाह केला. त्यानंतर ती अमेरिकेतच स्थायिक झाली. पुढील शिक्षणही तिथेच पूर्ण केले.

ABOUT THE AUTHOR

...view details