मार्वल स्टूडिओच्या 'एवेंजर्स: एंडगेम' चित्रपटाची प्रतीक्षा जगभर सुरु आहे. अॅवेंजर्स सिरीजमधील हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक जो रुसो सध्या मुंबईत आले आहेत. त्यांनी आशियातील प्रमोशनची सुरुवात केली.
'एवेंजर्स: एंडगेम'चे मार्वल अँथम साँग लॉन्च, रहमान यांचा हिंदी जलवा - Jo Russo
मार्वल स्टूडिओच्या सिरीजमधील 'एवेंजर्स: एंडगेम' हा शेवटचा सिनेमा २६ एप्रिलला येत आहे...याचे अँथम साँग लॉन्च झाले आहे...ए आर रहमान यांनी हे गीत संगीतबध्द केलंय...
मार्वल अँथम साँग लॉन्च,
यावेळी रुसो यांनी मार्वल अँथम या गाण्याचे लॉन्चिंग केले. 'रोके ना रुकेंगे यारा' हे गीत संगीतकार ए. आर. रहमान यांनी बनवले आहे. याच्या व्हिडिओमध्ये रहमान हे जल्लोषपूर्ण गीत गाताना दिसतात.
या अँथम साँगचे हिंदी आणि तामिळ व्हर्जन तयार करण्यात आल्याचे समजते. या गाण्यामुळे भारतात हा चित्रपट चांगला चालेल अशी थात्री निर्मात्यांना वाटत आहे. तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली.