मुंबई -स्त्रियांवरील अत्याचारावर आधारित राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. 'मर्दानी' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 'मर्दानी २'कडेची प्रेक्षकांचे लक्ष होते. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळाली.
'मर्दानी २'ने शुक्रवारी ३.८० कोटीची दमदार ओपनिंग केली होती. त्यानंतर शनिवारी ६.५५ कोटी आणि रविवारी ७.०८ कोटीचा कमाई केली. तीनच दिवसात या चित्रपटाने १८.१५ कोटीचा व्यवसाय केला आहे.