मुंबई - पानीपत चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहीजणांनी टीका केली असली तरी प्रचंड जनसमूदायाने ट्रेलर पाहिल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर चित्रपटातील मर्द मराठा हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला अपेक्षित प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
पानीपतचे पहिले गाणे 'मर्द मराठा' प्रेक्षकांच्या भेटीला - Arjun Kapoor latest news
पानीपत चित्रपटातील मर्द मराठा हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला अपेक्षित प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
पानीपतचे पहिले गाणे 'मर्द मराठा'
गीकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गाण्याला अजय- अतुल यांनी संगीत दिले आहे. सुदेश भोसले, कुणाल गांजावाला, स्वप्निल बांदोडकर, पद्मनाभ गायकवाड आणि प्रियंका वर्वे यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे.
आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन असलेला पानीपत या सिनेमात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या ६ डिसेंबरला पानीपत सर्वत्र रिलीज होत आहे.