'टोटल धमाल'च्या ट्रेलरचं मराठी स्पुफ पाहुन तुम्हीही खळखळून हसाल - comedy
धमाल कॉमेडी, अॅक्शन आणि मनोरंजक डायलॉग्सने भरलेला 'टोटल धमाल' या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरचा आता मराठी स्पुफ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चितळेंच्या भाकरवडीसाठी यातील कलाकार कशाप्रकारे प्रयत्न करतात, हे या मराठी स्पुफमधून दाखविण्यात आले आहे.
टोटल धमाल
मुंबई -धमाल कॉमेडी, अॅक्शन आणि मनोरंजक डायलॉग्सने भरलेला 'टोटल धमाल' या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरचा आता मराठी स्पुफ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चितळेंच्या भाकरवडीसाठी यातील कलाकार कशाप्रकारे प्रयत्न करतात, हे या मराठी स्पुफमधून दाखविण्यात आले आहे.
रितेश देशमुखनेही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 'अत्यंत विनोदी.. नक्की पाहा', असे कॅप्शन देऊन त्याने चाहत्यांना हा व्हिडिओ पाहण्यास सांगितले आहे.
या चित्रपटातून माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी तब्बल १७ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याशिवाय अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, महेश मांजरेकर, जॉनी लिव्हर अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.
'धमाल' आणि 'डबल धमाल'नंतर आता 'टोटल धमाल' हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी २२ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.