सोनाली कुलकर्णीच्या 'विक्की वेलिंगकर' सिनेमाचा उत्कंठावर्धक टीजर लाँच - Vicky Velingkar teaser launch
‘विक्की वेलिंगकर’चा नवीन टीझर निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरनेही समाजमाध्यमांवर उत्कंठा निर्माण केली असून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.
सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’चा नवीन टीझर निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरनेही समाजमाध्यमांवर उत्कंठा निर्माण केली असून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.