मुंबई - गेले दोन दिवस ज्यांच्या खुशालीची काळजी संपुर्ण देशाला होती ते भारतीय वायूदलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान हे कोणत्याही क्षणी भारतात परत येणार आहेत. त्यांच्या परतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. कलाविश्वातून अनेक कलाकारांनी त्यांच्या परतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा क्षण सर्वांसाठी अतिशय आनंदाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
भारतीय वैमानिक 'अभिनंदन' यांचे कलाविश्वातून स्वागत, कलाकरांनी व्यक्त केल्या भावना
गेले दोन दिवस ज्यांच्या खुशालीची काळजी संपुर्ण देशाला होती ते भारतीय वायूदलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान हे कोणत्याही क्षणी भारतात परत येणार आहेत. त्यांच्या परतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कलाकार
दिग्दर्शक आणि ख्यातनाम फॅशन डिझायनर विक्रम फडणीस, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेता ललित प्रभाकर यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विक्रम फडणीस याचा दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'स्माईल प्लिज' या सिनेमाचा मुहूर्त आज अभिनेता ह्रतिक रोशनच्या हस्ते मुंबईत पार पडला. यावेळी त्यांनी या घटनेबाबत बोलताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.